breaking-newsआंतरराष्टीय

‘आरसेप’बाबत भारताचे प्रश्न सोडविण्यास चीन इच्छुक

भारताने काही प्रश्न उपस्थित करीत ‘आरसेप’मधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यानंतर चीनने यावर परस्पर समझोत्यावर आधारित तोडगा काढण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.

आरसेप खुले आहे, परस्पर समझोत्याचे तत्त्व पाळण्यास आम्ही तयार आहोत आणि भारताने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास तयार आहोत, भारत आरसेपमध्ये सहभागी झाल्यास स्वागतच आहे, असे चीनने म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेत असल्याचे संयुक्त राष्ट्रांना अधिसूचित केल्याबाबत चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, अमेरिका हवामानाच्या मुद्दय़ावर जास्त जबाबदारी घेऊन काम करील अशी आशा आहे. हवामान बदल हे मोठे आव्हान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button