breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शिवसेना कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालय फोडले

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मंगलदास रोडवरील इफ्को टोकिओ या विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप करत, याच्या निषेधार्थ पुण्यातील शिवसैनिकांनी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे.

या तोडफोड प्रकरणी शिवसेना शहर पक्ष प्रमुख संजय मोरे म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांच्या हक्कांचे पैसे मिळावे. म्हणून, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पीक विम्याचे पैसे दिले जातील असे आश्वासन विमा कंपन्यांकडून दिले गेले होते. मात्र अद्याप देखील पैसे दिलेले नाही. त्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर पैसे द्यावे, अन्यथा आणखी तीव्र लढा उभारला जाईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button