breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, एसटी सेवा बंद

पुणे ( महा ई न्यूज ) –  मराठा आरक्षणासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. पुण्यात मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा बंद आहे.  संपूर्ण शहरात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त  वाढवण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

आज शहरात मराठा युवकांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे. जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे.  शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक वगळता इतर सर्व जिल्ह्यात बंद सुरु झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात सकल मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनात शहरातील सर्व भागातील सकल मराठा समाज बांधव एकत्रित येवू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button