breaking-newsTOP Newsराष्ट्रिय

दिल्लीत अचानक जोरदार पाऊस

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. दिल्ली-एनसीआर परिसरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली, तर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह अनेक ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे एनसीआरच्या बऱ्याच भागात अंधार दाटला होता.

महत्त्वाचे म्हणजे भारतीय हवामान विभागाने दिल्लीत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्ली-एनसीआर पावसासोबत गारा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत प्रचंड उकाडा वाढला असून मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये रेकॉर्डब्रेक तापमान नोंदवले गेले. तापमानाने 35 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला होता. त्यात पाऊस झाल्यानंतर 18 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवले गेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button