breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संत नामेदव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा; उद्या शहरात विविध कार्यक्रम 

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने श्री संत नामेदव महाराज यांच्या 668 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या शुक्रवारी (दि.10)विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष मोहन मुळे यांनी दिली.

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील मंदिरात शुक्रवारी सकाळपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री नामदेव महाराज यांच्या मुर्तींना सकाळी आठ ते नऊ या वेळेत अध्यक्षांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे. नऊ ते दहा या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा होईल. दहा ते बारा या वेळेत गजानन महाराज हरिपाठ भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी केली जाणार असून सव्वाबारा ते एक या दरम्यान अहवाल वाचन, देणगीदारांचा सत्कार केला जाणार आहे. दुपारी एक ते तीन दरम्यान महाप्रसाद आहे. दुपारी साडेतीन ते साडेचार दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे.

या कार्यक्रमाला समाजातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button