breaking-newsपुणे

पुण्यात संचारबंदी उठवली, मॉल्स आणि मार्केट उघडणार

पुणे – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात शहरात घातलेली संचारबंदी आज उठवण्यात आली आहे. शहरातील संचारबंदी हटवण्यात आली असली तरी सोशल डिस्टेंन्सिंग आणि मास्क घालणे मात्र बंधनकारक असणार आहे. तसेच राज्यात अनलॉक 3 ची प्रक्रिया सुरु झाल्याने शहरात शॉपिंग मॉल्स आणि मार्केटही 5 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

पालिका आयुक्तांनी जारी केलेल्या नव्या नियमावलीत कंटेन्मेंट झोनमधील दुकाने सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यांत उघडली जाणार आहेत. तर 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत शहरातील मॉल्स सुरु करण्यात येणार आहेत. मात्र सिनेमागृह आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरूच राहणार असून त्यासाठी सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 अशी वेळ देण्यात आली आहे. तर दवाखाने आणि औषध विक्रीच्या दुकानांसाठी नियमित वेळ असणार आहे. गोल्फ, नेमबाजी, जिम्नॅस्टिक, मल्लखांब तसेच आउटडोअर बॅटमिंटन खेळण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच दुचाकीवर आता दोघांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

दुचाकीवरून प्रवास करताना मास्क वापरणे, चालकाला हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. चारचाकीत चालकासह तिघांना, कॅबमध्ये चालकासह 3 जण, रिक्षात वाहकासह दोघांना प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. तसेच बांधकामांची सर्व ठिकाणे ज्यांना परवानगी देण्यात आली आहेत ती सुरु राहणार आहेत. तर 65 वर्षावरील व्यक्ती, 10 वर्षाखालील मुलांना घराबाहेर पाडण्यास मनाई करण्यात आली आहे. नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे, सभागृहे, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, जलतरण तलाव, जिम, स्पा यांना बंदी कायम असणार आहे, असेही नव्या नियमावलीत आयुक्तांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button