breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढय़ात मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेत ४१ मुलांना करोना

सोलापूर |

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी या गावात मुक्ताई मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेत ४१ मतिमंद मुलांना एकाचवेळी करोनाची बाधा झाली आहे. या सर्वाना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुRवारी पहाटे आश्रमशाळेतील मतिमंद मुलांना अचानकपणे ताप, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा आदी त्रास सुरू झाल्याचे आढळून आले. ही सारी करोनाची लक्षणे असल्यामुळे या सर्वाना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात आले. संशयित मुलांच्या करोना चाचण्या घेतल्या असता ४१ मतिमंद मुले करोनाबाधित आढळून आली. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व बाधित मतिमंद मुलांवर  वैद्यकीय उपचार करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव हे या बाधित मतिमंद मुलांवर योग्य प्रकारे औषधोपचार होण्यासाठी रुग्णालयात ठाण मांडून बसले आहेत. जिल्ह्यात यापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे जिव्हाळा प्रौढ मतिमंद मुलांच्या आश्रम कार्यशाळेत ५० मतिमंद मुलांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर मंगळवेढा येथील मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेतील मतिमंद मुलांना करोनाची बाधा होण्याचा हा दुसरा प्रकार समोर आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button