breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

वुमेन डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे युवती, महिलांसाठी उद्योजकता शिबीर

चिंचवड ( महा ई न्यूज ) – वुमेन डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील युवती, महिलासाठी उद्योजकता विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी दिली.
चिंचवड येथील आॅक्टो क्लस्टर सभागृहात सोमवार (दि.17) दुपारी 3 वाजता हे शिबीर होणार आहे. महिला विकास फाउंडेशन, पुणे आयोजित शहर व ग्रामीण भागातील युवती, महिलांसाठी महिला उद्योजकता विकास शिबीर आयोजित केले आहे.  या शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी. डेकाटे हे मार्गदर्शन करणार आहेत.
सदरच्या उद्योजकता विकास शिबिरात उद्योग क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणापासून तर शासनाचे नवनवीन औद्योगिक धोरण, महिलांविषयी उद्योग धोरण, शासनाच्या विविध योजना, अन्न व औषध विभाग, मुद्रा लोन, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, उद्योग आधार नोंदणी, शॉप अक्ट परवाना, राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी,  लोनसाठी अर्ज कसा करावा यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उद्योग स्थापनेसाठी आवश्यक लागणाऱ्या महत्वाच्या बाबींची माहिती शिबिरात देणार आहेत.
महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी कौशल्य विकास, महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती, रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण तसेच महिलांचे आरोग्य, शिक्षण क्षेत्रात संस्था कार्यरत आहे. हे शिबीर युवती व महिलांसाठी विनामूल्य आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे उद्योग स्थापन करणाऱ्या  इच्छुक युवती व महिलांसाठी उद्योग आधार नोंदणी विनामूल्य करून देण्यात येणार आहे.
सदरच्या महिला उद्योजकता विकास शिबिरात जास्तीत जास्त युवती व महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे संचालिका अपर्णा देशपांडे यांनी केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button