breaking-newsराष्ट्रिय

Corona Virus: १२ वर्षापूर्वीची भविष्यवाणी खरी ठरणार; कोरोना व्हायरसचं संकट अचानक टळणार?

नवी दिल्ली | महाईन्यूज

चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस आता जगातील अन्य देशात पसरलेला आहे. आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांचा जीव या व्हायरसमुळे गेला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे २९ रुग्ण आढळून आले. कोरोनापासून बचावासाठी विविध उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. जगभरातील अनेक देशांसाठी संकट म्हणून ठरलेल्या कोरोना व्हायरसबाबतची भविष्यवाणी यापूर्वीच झाली होती. काही दिवसांपूर्वीच अमेरिकिन लेखक डीन कुट्ज यांच्या पुस्तकाच्या आधारे ४० वर्षापूर्वीच कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत दावा केला होता आता आणखी एका अमेरिकेच्या लेखकाचे पुस्तक व्हायरल होत आहे.

या पुस्तकात लिहिलेल्या बाबी कोरोना व्हायरसच्या संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या पुस्तकावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकन लेखिका सिल्व्हिया ब्राउनी यांनी जुलै २००८ मध्ये “End Of Days” या नावाचं पुस्तक लिहिलं होतं. जगातील ७७ देशांत पसरलेल्या कोरोना व्हायरसची लक्षणं या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींशी समरूप आहेत. “End Of Days” यात पुस्तकात एक उल्लेख आढळतो की, २०२० मध्ये निमोनियासारखा गंभीर आजार जगभरात पसरेल. हा आजार फुफुस्स आणि श्वसननलिकेवर परिणाम करणार आहे. यावर कोणतंही उपचार होऊ शकणार नाही. या इशाऱ्यानंतर असं सांगितलं जातं आहे की, अमेरिकन लेखिकेला जगात पसरलेल्या या भयंकर आजाराबद्दल आधीच कल्पना आली होती. त्याचसोबत हा आजार अचानक नाहीसा होईल, ज्या वेगात हा व्हायरस पसरला जाईल तितक्याच जलद तो संपेल. परंतु दहा वर्षानंतर हा रोग पुन्हा परत येईल आणि स्वतःच संपून जाईल असंही या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button