breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात नव्या रुग्णांसाठी कोविड सेंटर म्हणून आता लवासा शहराचा विचार

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या रुग्णांसाठी कोविड सेंटरही आता कमी पडू लागले आहेत. त्यामुळे आता लवासा शहर ताब्यात घ्या आणि त्याचं कोविड सेंटरमध्ये रूपांतर करा,’ असा सल्ला भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

रोजच्या रोज वाढणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनापुढं आहे. जिल्हा प्रशासन शाळा, खासगी रुग्णालये व हॉटेल ताब्यात घेत आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन खासदार बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं असून लवासा ताब्यात घेण्याची सूचना केली आहे. लवासामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या अनेक इमारती आहेत. त्या वापराविना पडून आहेत. ज्या तालुक्यात लवासा वसले आहे, त्या मुळशी तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं हे शहर ताब्यात घेऊन त्याचं क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतर करणं योग्य ठरेल. तिथं मोठ्या संख्येनं बेड्स उपलब्ध करून देता येतील, याकडं बापट यांनी लक्ष वेधलं आहे.

‘लवासामध्ये लोकवस्ती फारच कमी आहे. त्यामुळं क्वारंटाइन सेंटरसाठी ही जागा योग्य आहे. अनेक रिकाम्या इमारतींबरोबरच लवासामध्ये एक अद्ययावर रुग्णालय देखील तयार आहे. त्यामुळं वैद्यकीय सुविधांवर वेगळा खर्च करण्याची गरज लागणार नाही. मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांना तिथं शिफ्ट करता येईल,’ असं बापट यांनी म्हटलं आहे.

मात्र बापट यांच्या या प्रस्तावाला स्थानिकांकडून विरोध होत आहे. लवासामध्ये क्वारंटाइन सेंटर सुरू केल्यास तिथं करोनाचा उद्रेक होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, संसर्गाचा कमीत कमी धोका असेल अशा पद्धतीनं येथील रिकाम्या इमारती ताब्यात घेता येतील, असं बापट यांचं म्हणणं आहे.

लवासा ताब्यात घेण्याच्या बापट यांच्या प्रस्तावाबद्दल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी साशंकता व्यक्त केली आहे. ‘लवासा हे डोंगराळ भागात असल्यानं तिथं क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. खासदार बापट यांच्या सल्ल्यावर आम्ही विचार करत अल्याचंही नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button