breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात कचरा वेचकांच्या मुलांची दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

पुणे |महाईन्यूज|

कागद,काच,पत्रा कष्टकरी पंचायतशी संबंधित कचरावेचकांच्या बऱ्याच मुलांनी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. परीक्षेला बसणाऱ्यांपैकी बरीच मुले त्यांच्या कुटुंबातील शिक्षण घेणारी पहिलीच पिढी आहेत आणि पूर्णपणे निष्ठा आणि निर्धाराच्या आधारे पुढे आली आहेत.

यावर्षी कचरावेचकांची 95 मुले दहावीच्या परीक्षेस बसली होती, या 95 पैकी 89 मुलांनी परीक्षा पास केली आहे. 7 मुलांनी 80% पेक्षा जास्त गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली, तर 16 मुले 70% आणि त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाली. महेश मगर याने 85 टक्के गुण मिळविले आहेत.

भविष्यात डॉक्‍टर होण्याची स्वप्ने असल्याचे त्यांनी सांगितले. पायल कसबे हिने 84 टक्के गुण मिळविले. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे. लोकांना मदत करण्यासाठी कौशल्ये व कष्ट वापरायचे आहेत, असेही तीने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button