breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत गदारोळ; विरोधकांचा थेट गृहमंत्र्यांवर आरोप

नागपूर ः रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत पाहायला मिळाले. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार येताच राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्यात आली होती, यासंदर्भात पुणे पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला. प्रश्नोत्तराच्या तासाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर गदारोळ निर्माण झाला, याच मुद्द्यावरून आज विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिक आक्रमक झाल्याचे दिसले, यावेळी त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहे. यावेळी विधानसभेत विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी देत प्रश्नोत्तरांऐवजी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र ही मागणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य न केल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे.

शिंदे फडणवीस सत्तेत आल्यानंतर रश्मी शुक्लांविरोधातील गुन्हा रद्द
या मुद्द्यावर नाना पटोलेंनी सरकारवर आरोप करत म्हटले की, रश्मी शुक्लांचा क्लोजर रिपोर्ट सरकारने घाईगडबडीने हायकोर्टाला पाठवला होता. माझ्यासह राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप झाले. या फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हे दाखल झाले. त्याच्या माध्यमातून जस सरकार महाराष्ट्रातील नाकाखालून बदलंल. नवं सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी रश्मी शुक्लांविरोधातील गुन्हा रद्द केले आणि क्लोजर रिपोर्ट हायकोर्टात पाठवला. यावेळी हायकोर्टानेही एवढी घाई कशाची? बिना चौकशी रिपोर्ट पाठवले का? अशी विचारणा केली.

फोन टॅपिंग करुन सरकार पडले, ब्लॅकमेलिंग केले
या सरकारने विरोधकांचे फोन टॅपिंग करून सरकार पडण्याचे, ब्लॅकमेलिंग करण्याचे काम केले, अशा परिस्थितीतही सरकार रश्मी शुक्लांना पाठीशी घातलं आहेत, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, न्यायालयात असलेल्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा करता येणार नाही. पण सुप्रीम कोर्टात या सरकारवरचं टांगती तलवार आहे, मग राज्यात संविधानिक सरकार काम करत आहे का? याला पाठींबा दिला जात आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

या प्रकरणात गृहमंत्र्यांचा थेट संबंध
या यातील एक मुक्तभोगी आहे. माझा फोन टॅपिंग केला गेला. सरकार बदलल्यानंतर रश्मी शुक्लांचा क्लोजर रिपोर्ट पाठवण्याचं कारण काय? असा सवाल करत यात गृहमंत्र्यांचा थेट संबंध असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
यावर अध्यक्षांनी नियमानुसार ५७ ची सुचना नाकारत कामकाज नियमाप्रमाणे चालणार असे सांगितले आणि कामकाज पुढे सुरु ठेवले. यावेळी विरोधकांनी विधानसभेत घोषणाबाजी देत सभात्याग केला आहे. विरोधक नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी म्हणत सभागृहातून बाहेर पडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button