ताज्या घडामोडी

संकलित ई – कचऱ्यामधून दुरुस्त केलेले संगणक गरजू वसतीगृहांना भेट

पिंपरी (Pclive7.com):-दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरण संरक्षण गतिविधि, पूर्णम इको व्हिजन फौंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शहरातील विविध पर्यावरण संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी ‘ई यंत्रण 2024’ ई कचरा संकलन व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. शहरामध्ये एक दिवसात 72  संकलन केंद्रामधून सुमारे 2100 किलो ई कचरा जमा करण्यात आला.  या मोहिमेत  115  कार्यकर्त्यांनी काम केले तर  265 पेक्षा जास्त लोकांनी ई कचरा जमा करून सहभाग नोंदविला.

यावेळी पर्यावरण गतिविधि प्रमुख रमेश करपे, निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, वसतिगृहाचे पालक दिलीप देशपांडे, आसावरी बुधकर, माणिक कुलकर्णी, सावरकर मंडळाचे श्रीकांत मापारी, रमेश बनगोंडे यांच्यासह  मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. भास्कर रिकामे यांनी या वसतीगृहांचा कार्यपरिचय करुन दिला.

1) संजीवनी मुलींचे वसतिगृह (38 मुली)- तळेगांव दाभाडे  – 2 संगणक

2) गोपाळ नवजीवन केंद्र – वडगांव मावळ  वनवासी विद्यार्थी वसतिगृह (50 मुले) – 2 संगणक

3) स्वामी विवेकानंद वनवासी विद्यार्थी वसतिगृह – राजगुरू नगर ( 45 मुले) – 2 संगणक

4) जनजाती कल्याण आश्रम, अकोले, नगर  (48 मुले)  – 2 संगणक

5) शबरीमाता कन्या छात्रावास कनाशी, नाशिक (55 मुली) – 1 संगणक

ई-यंत्रम मोहीमेचे प्रमुख मनेश म्हस्के यांनी आपल्या प्रास्ताविकांत ई कचरा संकलन व जनजागृती अभियानाचा आढावा घेतला. त्याबरोबरच मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व पिंपरी चिंचवडकरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुधीर मारूळकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या मोहिमेत व वेळोवेळी संस्थेकडे जमा झालेला इ- कचरा म्हणजेच मोबाईल, टि.व्ही. संगणक सर्व प्रकारची विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपरणे दुरुस्त करुन गरजू संस्थांना वितरित केली जातात. अशाच प्रकारे जमा झालेले नऊ संगणक संच दुरुस्त करून बुधवारी (दि.31) झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या पाच निवासी वसतिगृहांना देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button