breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी मतदारसंघात समस्यांचा डोंगर, महायुतीकडून मतदारांना केवळ आश्वासनांचे गाजर

  • शिवसेना आमदार एड. गाैतम चाबुकस्वार यांचे अपयश
  • झोपडपट्टीधारक, व्यापारी, व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. या मतदारसंघातील जवळपास पन्नासहून अधिक झोपडपट्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतला. मतदारांनी आमदार एड. गाैतम चाबूकस्वार यांना निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षात मतदार संघातील एकही प्रश्न सुटलेला नाही. नागरिकांच्या मुलभूत समस्यांकडे आमदार चाबुकस्वारांनी दुर्लक्ष केल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘कोणती विकासकामे पाहून मतदान करायचे’, अशा शब्दांत चाबुकस्वारांवर नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात टोलेजंग इमारतींबरोबर मोठ्या प्रमाणात झोपडपट्या देखील उभ्या राहिल्या. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबर इथल्या नागरी समस्यांमध्येसुद्धा वाढ झाली. वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, कचऱ्याची समस्या, या बरोबरच मोठ्या प्रमाणात झोपडपट्या देखील उभ्या राहिल्या. औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे रोजगाराच्या निमित्तानं नागरी संख्ये मध्ये मोठी वाढ झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे इथल्या जमिनींना प्रचंड भाव आला, याचा परिणाम छोट्या उद्योगांवर होऊ लागला. पिंपरी विधानसभा क्षेत्रातील उद्योग इतरत्र स्थलांतरित होऊ लागले. या मतदार संघावर पहिल्यापासून राष्ट्रवादीचं वर्चस्व राहील. 2014 च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेनं पिंपरीवर भगवा फडकावला. आता पुन्हा शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे आण्णा दादू बनसोडे आमने-सामने उभे राहिले आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ तुलनेने सर्वात लहान, आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा 12 किलोमीटरमध्ये दुतर्फा पसरलेला असा आहे. महापालिका इमारत, नाशिक फाट्यावरील दुमजली पूल, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड-सेप्रेटर, भक्ती-शक्ती समूहशिल्प असा बराच विकसित भाग या मतदारसंघात येतो. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 72 झोपडपट्ट्या आहेत, यापैकी 50 च्या आसापास याच मतदारसंघात येतात. त्यामुळेच मुस्लीम-दलित बहुल, झोपडपट्टी मिश्रित आणि तितकाच स्थानिकांचा ही प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे.

पिंपरी मतदारसंघातील समस्या आणि आमदाराचे अपयश

झोपडपट्यांमध्ये मोठी वाढ, ‘एसआरए’ सारखे प्रकल्प राबविण्यात अपयश, जेएनएनयुआरएमअंतर्गत तयार सदनिकांचा ताबा नाही, क्रीडांगण आणि उद्यानाची मोठी कमतरता, सार्वजनिक शौचालयांची कमतरता, नदी सुधार प्रकल्प राबविण्यात अपयश, हिंदुस्थान अँटिबायोटिक, बजाज, गरवारे सारख्या कंपन्या बंद पडल्या, उद्योग धंदे स्थलांतरित होत आहेत, सुशिक्षित बेरोजगारीत मोठी वाढ, पाच वर्ष आमदार झोपडपट्टीत फिरलेच नाहीत, सिंधी समाजाला सनद मिळाली नाही, मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल बनलेच नाही, झोपडपट्टीचे फोटोपास ट्रान्स्फर फी जैसे थे, झोपडपट्टी पुनर्वसन रखडले, मूलभूत सोयी सुविधांचा अभाव, असे कित्येक प्रश्न सोडविण्याची संधी असताना आमदार चाबुकस्वार यांनी गेल्या पाच वर्षात प्रयत्न केले नाहीत. हे आमदार चाबुकस्वारांचे अपयश मानले जात आहे.

पिंपरी मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या काळात हवा तसा विकास झाला नाही, भाजप – शिवसेना सरकारच्या काळात मंदीची लाट आल्याने पिंपरीतील अनेक उद्योग धंदे बंद पडले, व्यापारी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे इथल्या कामगारांमध्ये असंतोष आहे. दरम्यान, शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गाैतम चाबुकस्वार हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा मी काया-पालट केल्याचा फसवा दावा करीत आहेत, अशी टिका या मतदार संघातील सुजान नागरिक करू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button