breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दौंड-बारामतीदरम्यान धावली पहिली विद्युत रेल्वे

पुणे – दौंड-बारामतीदरम्यान पहिली विद्युत रेल्वे शनिवारी धावल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. दौंड ते बारामती या 44 किलोमीटर लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. ते शनिवारी पूर्णत्वास आले. दौंड येथून मध्यरात्री पहिली विद्युत रेल्वे बारामतीकरिता रवाना झाली. दरम्यान, या मार्गावर यापूर्वी डिझेलवरील रेल्वे धावत होत्या.

दौंड येथे विद्युत इंजिन बदलून डिझेल इंजिन लावण्यात येत होते. यामुळे बराच वेळ वाया जात होता. आता मात्र पुण्याहून थेट बारामतीपर्यंत विजेवरील रेल्वे धावू शकणार आहे. डिझेल इंजिनातून निघणार्‍या धुरामुळे होणारे प्रदूषण होणार नसून, पर्यावरणाचे रक्षण होईल. दरम्यान, सन 2016 मध्ये पुणे-दौंडदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले होते. आता दौंड-बारामतीदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे पुणे-बारामतीदरम्यान विजेवरील ईमू लोकल सुरू होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button