breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी न्यायालयातील ई लायब्ररीसाठी निधी द्या

  • खासदार अमर साबळे यांच्याकडे बार असोसिएशनची मागणी

पिंपरी – पिंपरी न्यायालयामध्ये ई लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी निधीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. लायब्ररी सुरू करण्यासाठी त्वरीत निधी द्या, अशी मागणी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. खासदार अमर साबळे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली.

 

पिंपरी अ‍ॅड. बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश पुणेकर, अ‍ॅड. अतिश लांडगे, अ‍ॅड. प्रसंन्‍न लोखंडे आदींनी निवेदन देऊन ही मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले की, आपल्या विभागात स्थानिक न्यायालय असून न्यायालयामध्ये काम करणार्‍या वकिलांची संख्या देखील दोन हजारांवर पोचली आहे; तसेच न्यायालयीन दावे व कामकाज देखील दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी न्यायालयात नवीन तात्पुरती इमारत देखील लवकरच मिळणार आहे. नवीन जागेतील इमारतीचे कामकाज देखील लवकरच चालु होणार आहे. त्यामुळे न्यायालयाकरिता जागा देखील मुबलक स्वरुपात उपलब्ध होणार आहे. सध्या पिंपरी न्यायालयामध्ये वकिलांकरिता उपलब्ध असलेली लायब्ररी ही अपुरी व जुन्या पद्धतीची आहे. न्यायालयीन कामकाजाचे वाढते प्रमाण पाहता वकिलांना ई-लायब्ररीची नितांत आवश्यकता असल्याचे खा. साबळे यांच्या निदर्शनास आणून दिले. ई-लायब्ररीसाठी पाच लाख रुपयांचा निधी द्यावा. त्याबाबत त्वरीत पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

 

या वेळी खा. साबळे म्हणाले की, न्यायालयाची व वकिलांची परिस्थिती पाहता व कामाचा व्याप वाढत आहे. त्यासाठी ई-लायब्ररी गरजेची आहे. या लायब्ररीसाठी पाच लाख रुपयांचा निधी त्वरीत मंजूर करून देणार असून त्या बाबतचे त्वरीत निर्देश देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन खा. साबळे यांनी दिले असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button