breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आंदोलन : हातगाड्यांवरील कारवाई थांबविण्यासाठी फेरीवाला क्रांती महासंघाची “लढाई”

पिंपरी – महापालिका फेरीवाल्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनांवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडण्यात आल्या.

 

यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, उपाध्यक्ष साईनाथ खंडिझोड, इरफान चौधरी, विनोद दोरगे, धन्यकुमार वास्ते, राजेश शिंगोटे, ललिता काटकर, पुष्पा पाटोळे, सुनीता गावडे, नंदा जेटीथोर, उषा कानडे, शोभा मेहेर, मोहंम्मद शेख आदींसह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील विक्रेते सहभागी झाले.

 

नखाते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी न करताच मोठ्या प्रमाणात कारवाई करून गोरगरिबांना उद्धवस्त करण्याचे काम महापालिकेकडून सुरु आहे. कायदा असताना महापालिकेकडून बेकायदेशीर काम करण्यात येत आहे. शहर फेरीवाला समितीची बैठक न घेता व मंजुरी न घेता मनमानी पद्धतीने हातगाडी, टपरी धारकांकडून 6 हजार 400, 12 हजार 800 अशा पद्धतीने कायदा झुगारून दंड वसुली करण्यात येत असल्याचा आरोप नखाते यांनी केला.

 

महापालिकेचे अतिक्रमण कारवाई दरम्यान हातगाडी धारकांना पोलीस व अधिकारी शिवीगाळ करत त्यांना धक्‍काबुक्‍की केली जात आहे. कारवाई करताना ज्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यांचेवर कारवाई करता येत नाही, असे असताना सरासरी सर्वांवर कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईतील साहित्य विनादंड परत करावे. महापालिका आयुक्‍त यांचे उपस्थितीत झालेल्या शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अमालबजावणी होत नाही. ती न केल्यास या पुढेही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी नखाते यांनी दिला.

 

शहरात असणारे व दुसर्‍या ठिकाणाहून आलेले टेंपोत व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई जरूर करावी. शहरात ज्या-ज्या ठिकाणी हातगाडी, टपरी, भाड्याने दिल्या आहेत. त्यांच्यावर ही कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

यानंतर शिष्ठमंडळाने अतिक्रमण विभाग प्रमुख सहशहर अभियंता राजन पाटील, अभियंता सतीश इंगळे, अभियंता मकरंद निकम यांच्याशी मागण्यांवर व कायदाबाबत चर्चा केली.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button