breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम त्वरित सुरु करा
नगरसेवक सचिन चिखले यांची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, अशी मागणी नगरसेवक सचिन चिखले यांनी केली आहे. पुणे मेट्रोचे मुख्य रामनाथ सुब्रमन्यम यांना या बाबत चिखले यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, शहरात सध्या अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. पिंपरी ते दापोडी पर्यत मेट्रोचे काम सुरु आहे. काही ठिकाणी बहुतांश कामे अंतिम टप्प्यावर आले आहेत. मेट्रो सुरु झाल्यानतर या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. त्याच पद्धतीने पिंपरी ते निगडी पर्यंत मेट्रोचे काम सुरु करणे गरजेचे आहे. त्याबाबत अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे. पाठपुरावा केला आहे. त्यानुसार त्वरित काम सुरु करावे, अशी मागणी नगरसेवक सचिन चिखले यांनी निवेदनाद्वारे केली.