breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिरूरच्या ‘ढ’ विद्यार्थ्याचे प्रगती (अधोगती) पुस्तक प्रसिध्द

  • जातीय राजकारणाच्या प्रश्नाला शंभर मार्क्स
  • सहा प्रश्नांना मात्र शंभर पैकी शून्य मार्क्स

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिरूरच्या एका विद्यार्थ्याने केलेल्या विकास कामांचे प्रगती पुस्तक जाहीर केले आहे. त्यात विकास कामांचे सहा प्रश्न विचारले असून विद्यार्थ्याला शून्य मार्क्स मिळाले आहेत. जातीय राजकरणाशी संबंधीत एका प्रश्नाला मात्र शंभर पैकी शंभर मार्क्स दिले आहेत. यावरून शिरूरच्या ‘ढ’ विद्यार्थ्यांचे हे प्रगती पुस्तक नसून अधोगती पुस्तक असल्याचे म्हटले आहे.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाना साधण्याची विरोधकांचे हे षडयंत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

खासदार आढळरावांना विचारलेले सहा प्रश्न पुढीलप्रमाणे…

       प्रश्न                                                    मार्क्स

  • शिवनेरी राष्ट्रीय स्मारक                           0/100
  • वढू-तुळापूर शंभुराजे प्रेरणास्थान            0/100
  • बैलगाडा शर्यत                                       0/100
  • चाकण विमानतळ                                  0/100
  • नाशिक पुणे महामार्ग                              0/100
  • पर्यटन विकास आणि रोजगार                 0/100
  • जातीय राजकारण                                 100/100

असे मार्क्स देण्यात आले आहेत. यावरून शिरूरच्या ढ विद्यार्थ्याचे (प्रगती) अधोगती पुस्तक जाहीर केल्याचे त्यात म्हटले आहे. खाली ता. क. गुरूजी आपले मतदार आहेत. ढ विद्यार्थ्याशी साम्य अढळल्यास घडवून आणलेला योगायोग समजावा, अशी खोचक सूचना देखील या पुस्तकात केली आहे. या आशयाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, खासदार आढळराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल कोल्हे हे माळी समाजाचे आहेत, असा उल्लेख केला होता. त्यावरून त्यांना जातीय राजकारणाचा प्रश्न विचारला असावा, असे दिसते. त्यात त्यांना शंभर पैकी शंभर मार्क्स ही मिळाले आहेत. तर, अमोल कोल्हे यांच्यावर देखील अशा पध्दतीने फोटोच्या माध्यमातून मजकूर छापून टिका करण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आढळराव यांच्यावर या माध्यमातून टिका केली नसेल कशावरून अशी चर्चा लोकांमध्ये केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button