breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी स्वत: केले प्लाझ्मा दान!

१३० जणांची नोंदणी, पिंपरी-चिंचवडकरांचा महाराष्ट्रासमोर आदर्श

पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी स्वत: प्लाझ्मा दान करीत आदर्श निर्माण केला. तसेच, कोरोनावर मात करुन बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करुन एक जीव वाचवावा, असे आवाहनही केले आहे.
पिंपरी -चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी ‘प्लाझ्मा दान’ शिबिराचे आयोजन केले.

वल्लभनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीत हे प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना आवाहन केले होते. त्यासाठी 130 जणांनी नोंदणीही केली होती. महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रवण हार्डिकर यांना विनंती केली होती की, प्रत्येक कोविड-सेंटरमध्ये प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सुरु करावे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा डोनेशन मोहीम सुरू केली आहे. प्लाझ्मा दातांच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे. त्यामुळे शहरात प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रभागनिहाय नियोजित कोविड केअर सेंटरमध्ये आपण स्वतंत्र ‘विंडो’ सुरू करावी. तसेच, प्लाझ्मा डोनेशनसाठी रुग्णांमध्ये जनजागृती करावी. मात्र, आज 15 ऑगस्टच्या निमित्त स्वत: प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करून या मोहिमेची सुरवात केली.

कोण करु शकतो प्लाझ्मा दान…
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये 21 दिवसांनंतर अँटीबॉडीज् तयार होतात. अशा रुग्णांचं प्लाझ्मा दान हे कोरोनाशी सध्या झुंज देत असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि जिवनदान देणार ठरू शकते. कारण, अँटीबॉडीमुळे कोरोनाग्रस्तांची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्रामुख्याने या शिबिरासाठी बोलवण्यात आले होते. अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात मदतच मिऴणार आहे.

महेश लांडगेंचे कुटुंबीयही करणार प्लाझ्मा दान…
महेश लांडगे यांनी स्वत: देखील प्लाझ्मा दान केलं आहे. एवढच नाही तर महेश लांडगे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियातील इतर सदस्यही प्लाझ्मा दान करण्यासाठी शिबिरामध्ये सहभागी झाले होते. शिबिरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही नियम व अटी सरकारने लागू केलेले ते सर्व नियम पाळत, सोशल डिस्टंट पाळत, मास्क, सॅनिटायझर सर्व प्रकारची काळजी घेत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन…
दरम्यान, सर्व पिंपरी-चिंचवडकरांनी आपली काळजी कोरोनापासून स्वत:च रक्षण करण्यासाठी सर्व नियमांच पालन कराव, तसेच कोणा एखाद्याच्या घरी जर कोरोना रुग्ण आढळला तर त्यांनी घाबरून न जाता योग्य ते उपचार करावेत असं आवाहन केले आहे.तसेच काही अडचण आली तर, मी आणि माझे कार्यकर्ते कायम जनतेस मदत करण्यास तयार आहोत असही महेश लांडगे यांनी आश्वासन दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button