breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने ८० हजारांचा टप्पा ओलांडला!

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज (दि.०४) सकाळी अकरा वाजेपर्यंत ८० हजार २७४ वर पोचली आहे. तर, ७३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात ५००३ रुग्ण सक्रिय आहेत. यात ४ हजार १०० रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या फक्त ९१२ आहे. मात्र, त्यातील ६८७ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. १३२ जण गंभीर असून ८५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

महापालिकेच्या कोरोना डॅशबोर्डवरील माहितीनुसार आज रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ७७ जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. मात्र, बरे झालेल्या ३०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत १ हजार ३४० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांमध्ये ४९ हजार ९८७ पुरुष, ३० हजार २८२ महिला व नऊ तृतीय पंथियांचा समावेश आहे. 

आजपर्यंत बारा वर्षांखालील सहा हजार १४६ मुलांना संसर्ग झाला आहे. १३ ते २१ वयोगटातील सहा हजार ५८६ युवक, २२ ते ३९ वयोगटातील ३२ हजार ३६७ तरुण, ४० ते ५९ वयोगटातील २४ हजार ५१० प्रौढ आणि साठ वर्षांवरील १० हजार ६२९ ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झालेला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख ७९ हजार ३०२ जणांचे अठ्ठावीस दिवसांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. सध्या १७ हजार ६०६ जण होम क्वारंटाइन आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button