ताज्या घडामोडीराष्ट्रिय

DANONE, Coca Cola सह अनेक कंपन्या रशियातील व्यवसाय गुंडाळणार

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामुळे जगभरातील व्यवसायिकांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून रशियातील अनेक विदेशी कंपन्या आपला व्यवसाय गुंडाळणार आहेत. यामध्ये DANONE, Coca Cola, NIKE, IKEA आदी कंपन्यांचा समावेश आहे. तर, कंपन्यांनी या देशावर विविध प्रकारे निर्बंध लादले आहेत.

रशियातील सर्वांत मोठी डेयरी कंपनी डॅनोनने (DANONE) रशियातील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीस वर्षांपासून ही कंपनी येथे कार्यरत होती. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे रशियातील आऊटलेट बंद करण्याचा निर्णय डॅनोनने घेतला आहे. एकूण व्यवसायाच्या तुलनेत रशियातून या कंपनीला पाच टक्के नफा होत होता.

डॅनोन पाठोपाठ कोका कोलानेही (CocaCola) असाच निर्णय घेतला आहे. रशियातील आपला व्यवसाय कोका कोलाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेण्यासाठी कंपनीवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे शुक्रवारी NOVUS स्टोर चेनने कोका कोलासोबतचा आपला करार संपुष्टात आणला.

चपला बनवणारी अमेरिकन कंपनी NIKE आणि होम फर्निशिंग संबंधित स्वीडिश कंपनी IKEAनेही रशियातील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. IKEA रशिया आणि बेलारुसमधील आपले आऊटलेट बंद करणार आहे. मात्र कंपनीने या निर्णयाला अराजकीय करार असं म्हटलं आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे रशियातील १५ हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड पडणार आहे.

दरम्यान, आयफोन आणि मॅकबुक निर्मिती कंपनी अॅप्पलनेही आधीच अशाप्रकारे आपला निर्णय जाहीर केला होता. तसेच, फेसबूकने आरटी आणि स्पुटनिक या बातम्यासंबंधातील कंपन्यांना ब्लॉक केले आहे. ट्विटरवरही रशियाच्या सरकारी वृत्तांच्या कंटेटला व्हिजिबिलिटी आणि एम्पिलिफिकेशन कमी करण्याची घोषणा केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button