breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना गौतमीचा कार्यक्रम, आयोजकांवर गुन्हा दाखल

पिंपरी : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या निमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले म्हणून आयोजकावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित शंकर लांडे यांचा सोमवारी वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्सचा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी हा क्रायक्रम पार देखील पडला. मात्र आयोजक असलेले अमित शंकर लांडे यांच्यावर परवानगी नसताना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला म्हणून भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘महाविकास आघाडी पुढील निवडणुकीत शंभर टक्के एकत्र राहील’; अजित पवारांचा दावा

या प्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रेय बाळासाहेब कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अमित लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून भोसरी पोलिसांनी कार्यक्रामासाठीची परवानगी नाकारली होती. तरी देखील गौतमी पाटीलचा जाहीर कार्यक्रम घेतला म्हणून आता थेट आयोजक असलेल्या बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button