breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिखलीतील ताडी’चे दुकान दुस-या दिवशी सुरु!; महिलांनी फोडले दुकान

पिंपरी |महाईन्यूज|

चिखलीमधील साने चौकात पोलिसांनी आदल्या दिवशी कारवाई केलेले ताडी विक्री दुकान दुस-या दिवशी लगेच सुरु झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करूनही सुरु झालेले दुकान त्रासदायक ठरत असल्याने स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन हे दुकान फोडले

चिखली येथील साने चौकाजवळ म्हेत्रे गार्डनकडे जाणा-या मार्गावर स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटी जवळ एक अवैध ताडी विक्रीचे दुकान आहे. या दुकानावर टवाळखोर थांबून असतात. रस्त्याने येणा-या-जाणा-या महिलांना व स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने येणा-या जाणा-या महिलांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे 60 ते 70 महिलांनी एकत्र येऊन बेकायदेशीर सुरु असलेले ताडी विक्री केंद्र फोडून टाकले.

पोलिसांनी या ताडी विक्री करणा-या बेकायदेशीर दुकानावर मागील दोन दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मात्र, पोलिसांची कारवाई झाल्यानंतर संबंधितांनी लगेच दुस-या दिवशी दुकान सुरु केले. परंतू, स्थानिक महिलांना पुढाकार घेवून ताडीचे दुकानच फोडून टाकले आहे.

बुधवारी पोलिसांनी संबंधित दुकानावर कारवाई केली. पोलिसांनी ताडीवाला, दारू विक्रेता आणि जागा भाड्याने देणारी एक महिला अशा तिघांना न्यायालयात हजर केले आहे.

सतीश माने – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button