breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुण्यात पदपथावर गणेश मूर्तीचे स्टॉल नको, पुणे महापौरांचा कारवाईचा इशारा

पुणे: यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण  साधेपणाने साजरे केले जात आहेत. काही दिवसांवर असलेला गणेशोत्सव सणही यंदा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहेत. यादरम्यान पदपथांवर अथवा रस्त्यांच्या कडेला गणेश मूर्तीच्या विक्री करीता उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेले आहेत.

या सर्व गणेशमूर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांना परिसरातील महापालिकेच्या शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही मोहोळ यांनी सूचित केले आहे. गणेशोत्सवात गणेश मूर्ती खरेदी करण्याकरीता नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिगचे पालन करावे या उद्देशाने रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच उपनगरातील सर्व पदपथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गणेश मूर्ती विक्रेत्या स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिलेले आहे.

या सर्व स्टॉलधारकांना महापालिकेतील वर्ग खोल्या एका आड एक मोफत उपलब्ध करून दिल्या जातील. याकरीता कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही. मात्र, जोपर्यंत स्टॉल असेल तोपर्यंत अनामत रक्कम म्हणून पाच हजार रूपये घेण्यात येणार आहे. दुसरीकडे प्रत्येक गणेश मूर्ती विक्रेत्यास प्रत्येक गणेश मूर्तीसह एक किलो अमोनियम बायोकार्बोरेट देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या रसायनाचा पुरवठा महापालिकेकडून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button