breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवडमधील १५ हजार नव्या मिळकतींचा करसंकलन विभागाकडून शोध

पिंपरी| प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून १५ हजार नवीन मिळकतींचा शोध घेण्यात आला आहे. जानेवारी अखेरपर्यंत एकूण ५० हजार मिळकती शोधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यातून वाढीव १०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

महापालिका भवनात सर्व क्षेत्रीय अधिकारी, प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक मंडलाधिकारी यांची बैठक झाली. त्या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी करसंकलन विषयक आढावा घेतला.

गेल्या वर्षी डिसेंबर अखेर करसंकलन विभागाला ४११ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा आत्तापर्यंत २४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत गतवर्षीइतकेच उत्पन्न मिळण्यासाठी थकबाकी वसुली पूर्ण करा, अशा सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. मिळकत करातून महापालिकेला ८७० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. पुढील पाच महिन्यांमध्ये त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत.
थकबाकी वसुलीसाठी तगादा

थकबाकीदारांकडून कर वसुली व्हावी, यासाठी शुक्रवारपासून (दि. २०) ७ झोननिहाय बिल वाटप सुरू करण्यात येणार आहे. सोमवारपासून (दि. २२) उर्वरित ११ झोननिहाय मिळकत करांच्या बिलाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर संबंधितांकडे प्रथम थकबाकी वसुलीसाठी तगादा लावण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना मागणी नोटीस दिली जाईल. मागणी नोटीस दिल्यानंतरही थकबाकीची रक्कम न भरल्यास संबंधितांना जप्ती नोटीस देऊन जप्तीची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button