breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून दोघे जखमी

उल्हासनगर | महाईन्यूज

उल्हासनगर व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ लोकलमधून पडून तरुण व तरुणी गंभीर जखमी झाले होते. तरुणीला कल्याण तर तरुणाला मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असून रेल्वे प्रशासनाचा सर्वत्र रोश व्यक्त होताना दिसत आहे. शहरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनपासूनजवळ असेलेली एफ कँबिन वालधुनीजवळ मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान एक तरुणी अंबरनाथ लोकलमधून पडलेली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उचलून नेण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनमध्ये कोणीही उपलब्ध नव्हते व मुलगी आपल्या जिवाची धडपड करीत असल्याचे चित्र होते. 

अखेर शिवसैनिकांनी तसेच दिनेश धुमाळ व विशाल रोखडे या तरुणाने मुलीला उचलून रिक्षातून कल्याण येथील रुग्णालयात हलविले असून मुलीची तब्येत चांगली असल्याची माहिती शिवसेना विभाग प्रमुख दीपक साळवे यांनी दिली आहे. तसेच मुलीचे नाव कळू शकलेले नाही, असे ते म्हणाले. विठ्ठलवाडी स्टेशनला रुग्णवाहिका, व्हीलचेअर, रेल्वे अधिकारी आणि पोलिस उपस्थित नसल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त केलेला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button