breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
#Covid-19: दिल्ली-मुंबई विमान व रेल्वे सेवा बंद केली जाण्याची शक्यता
नवी दिल्ली: दिल्ली येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महाराष्ट्रात सतर्कता बाळगली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली-मुंबई विमान, रेल्वे सेवा बंद केली जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून याबाबत अधिकृतरित्या काही सांगण्यात आले नाही. मात्र, हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वृत्त आहे.