breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत ‘जीएसटी’वर होणार ‘ज्ञानमंथन’, देशभरातून शेकडो सीए राहणार उपस्थित

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

निगडीतील दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने “जीएसटी ज्ञानमंथन” या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १३ व १४ डिसेंबर दरम्यान मुंबई-बेंगलुरू महामार्गालगत ताथवडे येथील बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये सकाळी ९  ते ५ या वेळेत  होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सीए संतोष संचेती यांनी दिली.

यावेळी आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड, जीएसटी व इनडायरेक्ट टॅक्सेस कमिटीचे अध्यक्ष सुशीलकुमार गोयल, आयसीएआयचे सेंट्रल काउन्सिल मेंबर सीए चंद्रशेखर चितळे, डब्ल्यूआयआरसीच्या अध्यक्षा सीए प्रीती सावला, उपाध्यक्ष सीए उमेश शर्मा, सीए आनंद जखोटीया व डब्ल्यूआयआरसीचे विविध पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेसाठी देशभरातील ८०० हून अधिक सीए उपस्थित राहणार आहेत. शाखाध्यक्ष सीए संतोष संचेती, उपाध्यक्षा सीए सिमरन लिलवानी, सचिव सीए पंकज पाटणी, खजिनदार सीए सचिन बन्सल, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए विजयकुमार बामणे, सीए चंद्रकांत काळे, सीए शैलेश बोरे कार्यकारी सदस्य यांनी परिषद आयोजनात पुढाकार घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button