breaking-newsमुंबई

मुंबई: रेल्वे प्रशासनाने एका उंदरासाठी खर्च केले तब्बल 2 हजार 800 रुपये

महाईन्यूज | मुंबई

एक उंदीर 2 हजार 800 रुपयांचा तर तुम्ही म्हणाल, असं काय आहे या उंदरात? की ज्यासाठी 2 हजार 800 रुपये मोजायचेत? आता हा प्रश्न आपण पश्चिम रेल्वेलाच विचारयला हवाय म्हणजे हा प्रकार काय आहे, हे लक्षात नक्कीच येईल. घरात उंदीर झाले तर आपण काय करतो? छोटे-मोठे सापळे आणतो व त्याला एखादी खायची वस्तू लावतो आणि उंदीर पकडतो किंवा मग ग्लू ट्रॅप, रॅट किल वगैरे पर्यायही असतातच. म्हणजे फार फार तर दीडशे दोनशे रुपयांचा खर्च होईल. पण आपली पश्चिम रेल्वे खूपच श्रीमंत आहे. तिनं एका उंदरावर तब्बल 3 हजार रुपये खर्च केलेत. जवळपास 5 हजार उंदरांवर सुमारे दीड कोटी रुपये उधळलेत. आता हे खोटं वाटत असेल, तर पुढे पहा…

  • मागच्या तीन वर्षांत पश्चिम रेल्वेने 5 हजार 457 उंदीर मारलेत. यासाठी आलेला खर्च 1 कोटी 51 लाख 41 हजार रुपये आहे.
  • म्हणजेच एका उंदरासाठी किती? तर 1 कोटी 51 लाख 41 हजार भागीले 5 हजार 457 असं गणित केलं.. की उत्तर येतं 2 हजार 800 रुपये..
  • म्हणजेच एक उंदीर मारण्यासाठी खर्च आला 2 हजार 800 रुपये

आता तुम्हीच विचार करा आपण जे तिकीटाचे म्हणून जे पैसे मोजतो ते नेमकी जातात तरी कुठे.. पण यावरही रेल्वे प्रशासनाकडे उत्तर आहेच. पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली की,उंदीर मारण्यासाठी खर्चची सरासरी काढणं कठीण आहे. औषधांनी मृत्यू पावलेल्याची ही संख्या आहे. मात्र जे उंदीर दुसरीकडे जाऊन मुत्यू पावले त्यांचा हिशेब लावण्यात येत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button