breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडले विजयाचे खाते

Loksabha : लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत असताना सूरतची जागा मात्र भाजपने बिनविरोध जिंकून विजयाचे खाते उघडले आहे. भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधातील इतर पक्षाच्या सर्व उमेदवारांनीआज रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याने मुकेश दलाल यांचा सुरतमधून खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची भाजपा आणि मोदी शाह यांच्यावर जोरदार टीका; म्हणाले..

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील  लोकसभा मतदारसंघात उमेदवारीअर्ज दाखल करणे सुरु असताना गुजरातमधील सुरतमधून भाजपाला सुखदायक बातमी मिळाली आहे. आज रोजी सूरत लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी एकूण आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तसेच, कॉंग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने या लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलली तर बसपाचे उमेदवार प्यारेलाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्यावर मुकेश दलाल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे समजत आहे. मुकेश दलाल यांच्या विजयाची घोषणा अधिकृतपणे निवडणूक आयोगाकडून लवकरच करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button