breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार आदिती निकम यांना जाहीर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – समाजिक क्षेत्रात योगदान देणा-या आदिती रंजीत निकम यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचा यंदाचा सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. महिला दिना दिवाशी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी सांगितली.

नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनांची माहिती निकम यांनी नागरिकांपर्यंत पोहोचविली आहे. या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यातही त्यांनी अग्रही भूमिका घेतली आहे. तत्सम सामाजिक कार्यात व त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेऊन निवड समितीतील सदस्यांनी त्यांना गुण दिले आहेत. गुणांकानुसार निकम पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत.

या पुरस्कारासाठी एकूण सात अर्ज आले होते. सहा अर्ज अपात्र ठरले आहेत. तर एक अर्ज पात्र ठरला आहे. येत्या 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पाच हजार रुपये, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे, अशी माहिती झगडे यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button