TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘एफडीए’ने जप्त केलेले २५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात राबवलेल्या मोहिमांमध्ये जप्त केलेल्या खाद्यतेलांपैकी २५ टक्के खाद्यतेलांच्या नमुन्यात भेसळ आढळली आहे. मुंबईतील दहिसर येथील अनुकूल अग्रो या कंपनीतून कच्ची घाणीचे मोहरीचे तेल जप्त केले होते. यामध्ये राईस ब्रान तेलाची भेसळ केल्याचे आढळून आले. मोहरीच्या तेलाची १६५ ते १७५ रुपये प्रती लिटर दराने विक्री होते. त्यामध्ये भेसळ करण्यात आलेल्या राईस ब्रान तेलाची प्रती लिटर १२० रुपये दराने विक्री होते. चिंचबंदर येथील ऋषभ शुद्ध घी भांडार येथून जप्त केलेल्या पोरस तुपामध्ये पाम तेलाची भेसळ केल्याचे आढळून आले. ७०० ते ८०० रुपये प्रती किलो दराने विक्री होणाऱ्या तुपामध्ये ९० ते ९५ रुपये प्रती लिटर दर असलेल्या पाम तेलाची भेसळ करण्यात आली होती. तसेच घाटकोपर येथील जय बजरंग ऑईल डेपो येथून सुहाना पाम तेल जप्त केले. प्रत्यक्ष वेष्टनावर नमूद केलेल्या वजनापेक्षा प्रत्यक्षात कमी वजन असल्याचे आढळून आले. एक लिटर पाम तेलाच्या पिशवीत १५ ते २० ग्रॅम तेल कमी भरले. या सर्व विक्रेत्यांवर एफडीएने कारवाई केली आहे. तसेच या विक्रेत्यांनी खाद्यतेल व तूप कोणत्या किरकोळ विक्रेत्यांना अथवा उपहारगृहांना विक्री केली आहे, याची माहिती गोळा करण्यात येत आहे. नमुने तपासणीसाठी फिरती प्रयोगशाळा ग्राहकांची मागणी असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे एक फिरती प्रयोगशाळा उपलब्ध आहे, त्याच्या मदतीने नमुने गोळा करून तपासणी करण्यात येईल.

भेसळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांना खाद्यतेल पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या विक्रेत्यांकडून कायम स्वरूपी खाद्यतेलाची खरेदी करणाऱ्या दुकानदारांना जागरूक करण्यात येणार असून त्यांनाही भेसळीचा संशय येत असेल तर त्यांनी तेलाची विक्री न करता अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, अस आवाहन एफडीएचे सह आयुक्त (अन्न) शैलेश आढाव आणि सह आयुक्त (अन्न) श रा. केकरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button