breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धुमसते ‘वायसीएम’ : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनतर्फे राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन

पिंपरी । प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाकडे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता वारंवार निवेदने देऊन चर्चेसाठी वेळ मागितला होता. पण, शासनाने व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस् फेडरेशन तर्फे  आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी वायसीएम मधील सर्व परिचारिका, कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.

परिचारिकांच्या मागण्या…

१) महाराष्ट्रातील परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून रिक्त असलेली ६००० पदे तातडीने भरावी. कंत्राटीकरण करु नये.

२) परिचारिकांना रोटेशननुसार ७ दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर ७ दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी.  कोविड ड्युटी ४ तासांच्या शिफ्टमध्ये असावी.

३) कोविड बाधित व संशयित रुग्णाच्या सेवेत कार्यरत परिचारिकांना दर्जेदार PPE किट, N-95 मास्क,  इतर साहित्य त्वरित मिळावे.

४) कोविड ड्युटी नंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी. 

५) ह्रृद्यरोग,  मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविड ड्युटी मध्ये सुट मिळावी.

६) कोविड रुग्णास सेवा देतांना मृत्यु आल्यास शासनाने घोषित केलेली ५० लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसेच वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी.

७) परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्या साठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असाव्यात.

८) बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड रुग्णास सेवा देणाऱ्या परिचारिकांना ३००रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येतो,  त्याप्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात यावा.

९) कोविड सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने विनाविलंब समिती गठित करावी.

सर्व सन्माननीय परिचारक/ परिचारिकांनी आपल्या न्याय मागण्या मान्य करून घेण्याकरिता एकजुटीने या लक्षवेधी दोन तास कामबंद आंदोलनात सहभागी व्हावे व शासनास / प्रशासनास् आपल्या एकजुटीची शक्ती दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनतर्फे करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button