TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल, व्यावसायिकाच्या कुटुंबाला धोका

व्यावसायिकाच्या कुटुंबियांचया वयाोवृदध आईवडिलांना घरात घुसून शिवीगाळ

नवी मुंबईतील पारसीक हिल परिसरातील धक्कादायक घटना

मुंबई | प्रतिनिधी

व्यावसायिक अपहार करुन शिवीगाळ करीत एका डॉक्टरने व्यावसायिकाच्या वयोवृदध आई वडिलांना धमकी व धकाबुकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरकडून आमच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती व्यावसायिक विशाल ढोमसे यांनी दिली.

याप्रकरणी जबरीने घरात घसून केअरटेकरला धक्काबुक्की करत शिवीगाळ करणाऱ्या व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डॉ. मनिष तरडेजा याच्यावर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, याप्रकरणी सीमा ढोमसे (आई) यांनी फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे तक्रारदारांच्या घरी २६ सप्टेंबर २०२० रोजी आरोपी डॉ. मनिष तरडेजा जबरीने घुसले. यावेळी सीमा ढोमसे यांच्या घराचे अनधिकृत बांधकाम असलेली खोली महापालिकेच्या सूचनेनुसार स्वत: हटवण्याचे काम सुरू होते. कंपाउंड बाहेर डम्पर उभा होता. घरात कामगार व सुपरवायझर काम करत होते. तक्रारदार सीमा ढोमसे, त्यांचे पती अनिल ढोमसे व केअर टेकर, वाचमन हे ढोमसे यांच्या घराच्या पार्किंगमध्ये उभे होते. यावेळी आरोपी डॉ. तरडेजा बळजबरीने घराच्या कंपाऊंडमध्ये घुसला. केअर टेकरने अडविण्याचा प्रयत्न केल्यानतर त्याला धक्का दिला. हातात मोबाईल घेऊन तक्रारदार यांचे व्हिडीओ शुटींग करू लागला.  तक्रारदार यांना व त्यांच्या पतीना मुलांच्या नावाने अर्वाच्च शिवीगाळ करू लागला. त्यानंतर आरोपीने तक्रारदार यांना शिवीगाळ केली. सुरक्षारक्षक यांनी आरोपीला धक्का देऊन बाहेर काढले. त्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, डॉ. तरडेजा याला सीबीडी बेलापूर पोलिसांनी दि. २६ डिसेंबर २०२० रोजी अटक केली. त्यानंतर २७ डिसेंबरला न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. मात्र, डॉ. तरडेजा बाकीच्या तक्रारी मागे घेण्याकरिता कुटुंबियांच्या धमक्या देत आहे व त्यांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती फिर्यादी यांनी दिली.

डॉ. तरडेजा पती-पत्नी गुन्हेगारी पार्श्वभूमी…

डॉ. मनिष तरडेजा आणि व्यावसायिक विशाल ढोमसे यांच्यामध्ये व्यावसायातील अपहारावरुन वाद आहेत. तरडेजा हा गुन्हेगारी पार्श्भूमिचा आहे. त्याच्यावर या अगोदर कलम ३४, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१ या कायद्यांतर्गत गृन्हे दाखल आहेत. याबाबत डॉ. तरडेजा यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये डॉ. तरजेडा याची पत्नी डॉ. रचना तरडेजा हीसुद्धा आरोपी आहे. त्यापैकी मुंबई उच्च न्यायालय, ठाणे न्यायालय, हॉलीडे बेंच आणि पुणे सेशन कोर्ट येथे खटला सुरू आहे.  या खटल्यांमध्ये डॉ. तरडेजा याचे सवॅ अटकपुवॅ जामीन नामंजूर झाले आहेत. तयामुळे संबंधित खटले मागे घेण्यासाठी डॉ. तरडेजा हा ढोमसे यांचया कुटुंबियांवर दबाव निर्माण करीत आहे, असा आक्षेप विशाल ढोमसे यांनी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button