breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिका प्रशासनाकडून विरोधी पक्षनेत्याला ‘कोलदांडा’, नानांचा संताप अनावर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

स्मार्ट सिटी कार्यक्रम अथवा महापालिकेच्या अन्य उपक्रमांची माहिती देताना आयुक्तांकडून बरेचदा विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेतले जात नाही. आज देखील आंतरराष्ट्रीय फेस्टिवल ऑफ फ्युचर उपक्रमाची माहिती देण्यासाठी काटे यांना बोलवले नाही. आपल्याला न बोलावताच पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असल्याचे समजताच नानांनी चौथ्या मजल्यावरील आयुक्तांच्या दालनाकडे धाव घेतली. एरव्ही मवाळवादी असलेल्या नानांनी आपला मूळ स्वभाव बाजुला सारून चालू पत्रकार परिषदेतच आयुक्त आणि अन्य अधिका-यांना खडेबोल सुनावले.

अधिकारी परस्पर कारभार करत असल्याचा आक्षेप घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सोमवारी (दि.13) चांगलाच संताप व्यक्त केला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांनी संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख निळकंठ पोमण यांची कानउघाडणी केली.

विरोधकांना अंधारात ठेवून अंधाधूंद कारभार करण्याची आयुक्तांची भाजपधार्जीनी पध्दत अजुनही कायम असल्याचा प्रत्यय आज पालिकेतील एका उपक्रमाची माहिती देताना आला. आयुक्त हर्डीकर यांनी एका महोत्सवाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा सगळा प्रकार घडला.

महापौर माई ढोरे यांच्यासह स्मार्ट सिटीचे अधिकारी व काही भाजप नगरसेवक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. परंतु, विरोधी पक्षनेते नाना काटे यांना या पत्रकार परिषदेची माहितीच देण्यात आली नव्हती. परस्पर पत्रकार परिषद घेतली जात असल्याची माहिती समजताच आयुक्त दालनात प्रवेश करत नानांनी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिकेचे संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख पोमण यांच्यावर संताप व्यक्त केला.

अधिका-यांची केली कानउघडणी

स्मार्ट सिटी, महापालिकेच्या कार्यक्रमाची, उपक्रमांची आणि कामांची कोणतीही माहिती आपल्याला दिली जात नाहीत. पोमण परस्पर कारभार करतात. ते विश्वासात घेत नसल्याचा आक्षेप घेत त्यांनी आयुक्तांसमोर संताप व्यक्त केला. तर, पोमण यांचीही कानउघाडणी केली. नंतर आयुक्तांना काटे यांची समजूत काढावी लागली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button