breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांची फाशी रद्द

लाहोर | महाईन्यूज

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा लाहोर उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिलेला आहे. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावलेली होती. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचं लाहोर उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. मुशर्रफ यांनी त्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला लाहोर उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलेलं होतं. लाहोर उच्च न्यायालयाच्या नवीन निर्णयामुळे विशेष न्यायालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.

परवेज मुशर्रफ यांच्यावरील देशद्रोहाचा खटला कायदेशीरपणे चालला नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. विशेष न्यायालयाने 17 डिसेंबर 2019 ला देशद्रोहाच्या आरोपात मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावलेली होती. हा खटला 2013 मध्ये तत्कालीन पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)सरकारने दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी पेशावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्‍यक्षतेखालील तीन सदस्‍यीय खंडपीठाने केली आहे. संविधान भंग करुन 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी जाहीर केलेली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. तर 31 मार्च 2014 रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं. न्यायमूर्ती सैयद मजहर अली अकबर नकवी, न्यायमूर्ती मोहम्मद अमीर भट्टी आणि न्यायमूर्ती मसूद जहांगीर यांनी मुशर्रफ यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button