breaking-newsराष्ट्रिय

बसपाचे कॉंग्रेसबरोबर आघाडीचे सूतोवाच

  • जागा वाटपात आदर राखला जाण्याची अपेक्षा

लखनौ – बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी पुढील वर्षाच्या लोकसभा निवडणूकींमध्ये कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचे सूतोवाच केले आहे. जागा वाटपामध्ये बसपाला सन्मानाने जागा दिल्या गेल्या तर बसपा ही निवडणूक आघाडी करून लढवेल, असे त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या.

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर मायावती यांनी कॉंग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्या या प्रस्तावावर कॉंग्रेस पक्षामध्ये भिन्न मते व्यक्‍त होत आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बसपाबरोबर आघाडी केल्यास कॉंग्रेसला फायदा होईल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र राजस्थानमध्ये प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी बसपाबरोबर कोणतीही आघाडी केली जाण्याची शक्‍यता फेटाळली आहे.

तिकडे मायावती यांनी कोणत्याही आघाडीसंदर्भात मत प्रदर्शन न करण्याची स्पष्ट सूचना आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे. जोपर्यंत पक्षनेतृत्वाकडून आघाडीबाबतची घोषणा होत नाही, तोपर्यंत उघड मतप्रदर्शन टाळण्याचे त्यांचे धोरण आहे. गेल्याच आठवड्यात धर्मनिरपेक्ष जनता दलानेही आघाडीसाठी कॉंग्रेसने आपल्याला गृहित धरू नये अशी भूमिका व्यक्‍त केली होती.

लोकसभा निवडणूकीसाठीचा आघाडीचा प्रस्ताव आहे. मात्र कॉंग्रेसकडून त्यास कसा प्रतिसाद मिळतो, त्यावर पुढील सर्वकाही अवलंबून असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी म्हणाले होते. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि जेडिएसचे आघाडी सरकार दोन महिन्यांपूर्वीच स्थापन झाले आहे. पण त्यांचे फार सख्य असल्याचे चित्र नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button