breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वादग्रस्त पुस्तक मागे घ्या’, अन्यथा राज्यातील एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही; छावा, संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

”आज के शिवाजी नरेंद्र मोदी” पुस्तकाच्या विरोधात सर्व सामाजिक पुरोगामी संघटनांच्या वतीने डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज सोमवारी (दि. 13) निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले. हे पुस्तक आठ दिवसांत मागे नाही घेतले तर महाराष्ट्रात भाजपचे एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, रशीद सय्यद, सतिश कदम, गौतम दिवे, अक्षय गायकवाड, विनोद घोडके, सुमित डोलारे, आकाश कांबळे, छावाचे राजू पवार, गणेश पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीश वाघमारे, राजू खैरनार, दिलीप रणपिसे, गिरीधर लड्डा, पराग जाधव, सुनील कांबळे, माजी नगरसेविका जनाबाई जाधव, दिपक खैरनार, अपना वतन संघटनेचे हमिद शेख, फारुख शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनात संभाजी ब्रिगेड, नागरी हक्क सुरक्षा समिती, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा आदी सामाजिक संघटना सहभागी होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर, नागरी हक्क समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, छावाचे धनाजी येळकर पाटील, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे जिवन बोराडे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

हे पुस्तक जर आठ दिवसांत मागे नाही घेतले, तर महाराष्ट्रात भाजपाचे एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा छावाचे धनाजी येळकर पाटील यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button