breaking-newsमहाराष्ट्र

पालघरच्या केळवे समुद्रात चौघे बुडाले

पालघर – केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे.

केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना काल रविवार दुपारी घडली आहे. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्या असल्याने येथे पर्यटकांची गर्दी होती. नालासोपारा पूर्व येथील गौरव भिकाजी सावंत (वय 17), संकेत सचिन जोगले (17), देविदास रमेश जाधव (16), दिपक परशुराम चालचाडी (20), दिपेश दिलीप पेडणेकर (17), श्रीतेज नाईक (15), तुषार चिपटे (15) ही 7 मुले पर्यटनासाठी आली होती. हे सर्वजण दुपारी अडीचच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरले. दरम्यान, सात जणांपैकी चौघेजण समुद्राच्या लाटांसोबत पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यातील दिपक चालवाडी याचा मृतदेह सापडला आहे. तर दिपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक आणि तुषार चिपटे यांना शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button