breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

आता एड्स होणार बरा ?

आतापर्यंत एड्सवर औषध सापडलं नसल्यानं कधीही न बरा होणारा आजारामध्ये समावेश करण्यात आला.पण आता या आजारावर उपाय सापडल्या चा दावा करण्यात आला आहे. साओ पाउलोच्या फेडरल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, औषधाच्या एका मिश्रणाने ब्राझीलचा एक व्यक्ती एड्समुक्त झाला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, HIV पीडित व्यक्तीला अनेक अँटीरेट्रोव्हायरल औषधांचे आणि निकोटिनामाइड ड्रगचे कॉम्बिनेशन देण्यात आले.यासंदर्भात बोलताना यूनिव्हर्सिटीने म्हटले आहे, की गोपनीयता कायद्यामुळे आम्ही संबंधित रुग्णाचे नाव जाहीर करू शकत नाही. मात्र, आम्ही लवकरच जागतीक आरोग्य संघटनेला (WHO) यासंदर्भात माहिती देणार आहोत.

टाइम मॅगझीनने दिलेल्या एका वृत्तानुसार, वैज्ञानिकांच्या चमूने एड्स-2020 नावाने एका ऑनलाईन कॉन्फ्रेन्सचे आयोजन केले होते. यात वैज्ञानिकांनी एड्सवरील औषधाचा दावा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या वैज्ञानिकांनी एका एड्सबाधित रुग्णाला पूर्णपणे बरे केले आहे. डॉ. रिकार्डों डियाज यांनी सांगितले, की ब्राझीलमधील संबंधित व्यक्तीला ऑक्टोबर 2012मध्ये एचआयव्हीचे निदान झाले होते. ट्रायलदरम्यान रुग्णाने एड्सच्या उपचारावेळी घ्यावी लागणारी ओषधे बंद केली होती.

रिसर्चदरम्यान रुग्णाला दीर्घकाळ दर दोन महिन्याला अँटीरेट्रोव्हायरल औषध आणि निकोटिनामाइड ड्रगचे कॉम्बिनेशन देण्यात आले.एका वर्षानंतर जेव्हा रुग्णाच्या रक्ताची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, रुग्णाच्या शरीरात व्हायरसचा खात्मा करण्यासाठी अँटीबॉडीजच्या लेव्हलसंदर्भात अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

रुग्णनानेही रिकव्हरीनंतर सांगितले की “मला दुसरे आयुष्य लाभले आहे. मी व्हायरस मुक्त झालो आहे. लाखो एचआयव्ही संक्रमितांसाठी हा आशेचा किरण आहे. हे जीवन एका गिफ्ट सारखे आहे.”

या प्रकरणाची पुष्टी झाल्यास, स्टेम सेल ट्रांसप्लांट न करता एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही अथवा एड्स मुक्त केल्याचे हे पहिलेच प्रकरण ठरेल. यापूर्वी स्टेम सेल ट्रांसप्लांटच्या माध्यमाने लंडनच्या एका व्यक्तीचा एड्स बरा करण्यात आला होता. संशोधक अॅडम कास्टिलेजा यांनी म्हटले आहे, की रुग्ण जिवंत आहे आणि व्हायरस मुक्त आहे. यावरून सिद्ध होते, की एड्सवर उपचार केला जाऊ शकतो. आता ब्राझीलमधील या व्यक्तीच्या शरीरात पुन्हा दुसऱ्यांदा व्हायरस आढळण्याचा धोका आहे, की नाही. यावर तज्ज्ञांचे लक्ष आहे. हे पुढे होणाऱ्या टेस्टमध्ये समोर येईल.

माणसाला एकदा HIVचे संक्रमण झाले, तर या व्हायरसला शरीरातून बाहेर काढणे अत्यंत कठीण आहे. कारण हा व्हायरस ब्लड सेल्समध्येच आपले घर तयार करतो. तसेच तो औषधानेही आपली जागा सोडत नाही. मात्र, रुग्णाने औषधी बंद केली तर हा व्हायरस स्वतःला अॅक्टिव्ह करतो आणि आजार पुन्हा उद्भवतो.कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एड्स तज्ज्ञ डॉ. मोनिका गांधी यांच्या मते, ही माहिती अत्यंत इंट्रेस्टिंग आहे. मात्र, आरंभिक पातळीवर आहे. कारण, असे केवळ एकाच व्यक्तीच्या बाबतीत घडले आहे. इतर 4 लोकांवरही हाच उपचार करण्यात आला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. यासंदर्भात आणि संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button