breaking-newsमहाराष्ट्र

वाघमारेसह साथीदारांना अटक करावी : पानसरे कुटुंबीय

कॉ. पानसरे हत्येच्या अनुषंगानेही महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्‍यता असल्याने एसआयटीने परशुराम वाघमारेसह साथीदारांचा ताबा घेऊन अटक करावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली. कॉ. पानसरे यांच्या स्नुषा प्रा. मेघा पानसरे म्हणाल्या की, लंकेश यांच्या हत्येची कबुली देणारा संशयित मारेकरी कर्नाटक एसआयटीच्या हाताला लागला आहे.

पुरोगामी चळवळीतील नेत्यांच्या हत्येचे गूढ आणि त्यामागे दडलेल्या मास्टरमाईंडचा चेहरा उघड्यावर येईल. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पुरोगामी चळवळीतील हत्येप्रकरणी तपास यंत्रणांच्या हाती प्रथमच ठोस माहिती लागत आहे. चौकशीतून कॉ.पानसरे यांच्याही हत्येचा उलगडा होऊ शकेल, अशी अपेक्षा मेघा पानसरे यांनी व्यक्‍त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button