breaking-news

पंढरपुरात कोरोना रुग्णांमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

पंढरपूर – पंढरपूरमध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी रात्री उशिरा तेथे 68 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात ग्रामीण भागातील 20 तर शहरातील 48 नव्या रुग्णांचा समावेश आहे. पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे पंढरपूरकरांच्या चिंतेत भर पडली.

पंढरपूरमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 350 इतकी झाली आहे. याठिकाणी शुक्रवारी 25 जण कोरोनामुक्त झाले आणि त्यांना शनिवारी डिस्जार्च देण्यात आला. यासह पंढरपुरात एकूण बरे होणाऱ्यांची संख्या 87 इतकी झाली असून एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 374 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी 306 निगेटिव्ह तर 68 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button