breaking-newsक्रिडा

सलामीवीर धवनची आक्रमक खेळी, उपहारापूर्वीच केले शतक

बंगळुरु – भारताचा सलामीवीर शिखर धवनने अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत शतक झळकावले आहे. धवन हा पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा जगातील सहावा आणि भारताच पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने केवळ 87 चेंडूत ही शतकी कामगिरी केली आहे.

भारताने 27 षटकात बिनबाद 158 धावा केल्या आहेत. मुरली विजय 72 चेंडूत नाबाद 41 तर शिखर धवन 91 चेंडूत 104 धावांवर खेळत आहेत. या कसोटीत कर्णधार अजिंक्‍य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रतिस्पर्धी संघ

भारत– अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, लोकेश राहुल, करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा व उमेश यादव.

अफगाणिस्तान – असगर स्तानिकझाई(कर्णधार), मोहम्मद शेहझाद, जावेद अहमदी, रहमत शाह, इहसानुल्लाह जानत, नासिर जमाल, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर झाझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, झहीर खान, आमिर हमझा होटक, सईद अहमद शिरझाद, यामिन अहमदझाई वफादार व मुजीब उर रेहमान.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button