breaking-news

लोखंडी रॉडने प्रायव्हेट पार्टवर हल्ला, सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार

नागपूर | नागपूरमध्ये एका नोकरदार तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. रिपोर्टनुसार ५० वर्षाच्या व्यक्तीने १९ वर्षाच्या मुलीला मादक पदार्थ देऊन बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्येच या नराधमाने युवतीवर अत्याचार केले असल्याचं समोर आलं आहे. आरोपी आणि पीडित तरुणी हे दोघेही एकाच कंपनीत काम करत होते.

बलात्कारनंतर आरोपीने अत्यंत भयंकर कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिच्या गुप्तांगाला स्टील रॉडने देखील इजा पोहचवली. ही घटना २१ जानेवारीला घडली. पण याप्रकरणी पीडित मुलीने २४ जानेवारीला पारडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यान, यानंतर शनिवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि चौकशीसाठी ४ दिवस ताब्यात घेतलं. आरोपी हा कंपनीमध्ये सुपरवायझर असून पीडित तरुणी त्याच कंपनीमध्ये काम करते. तिचं रिपोर्टिंग हे देखील त्यालाच होतं. पोलिसांनी याबाबत अशी माहिती दिली, पीडितेचा भाऊही त्या कंपनीत नोकरी करायचा, तो नुकताच १५ जानेवारीला कंपनीत रुजू झाला होते. हे दोघे भाऊ-बहीण कंपनीच्या एका गेस्ट हाऊसमध्येच राहत होते. त्याचवेळी आरोपी आणि आणखी एक महिलाही तेथील दुसऱ्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button