breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंकजा मुंडे आता विभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार

पुणे |महाईन्यूज|

कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी मुंबईत झाली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या उपोषणात देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button