breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी पिंपरी- चिंचवड भाजपाची ‘वज्रमूठ’

  • शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या प्रभागनिहाय बैठका
  • मतदान प्रक्रिया, नियमावलीबाबत जनजागृती

पिंपरी | प्रतिनिधी

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत यश मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपाने ‘टीम वर्क’ सुरू केले आहे. निवडणूक प्रचाराचा ज्वर वाढला असून, शहरातून भाजपा उमेदवाराला मताधिक्य मिळावे. यासाठी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी ‘वज्रमूठ’ बांधली आहे.
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पिंपरी- चिंचवड भाजपा एकवटली आहे. शहरात प्रभागनिहाय बैठका सुरू आहेत. युवा मोर्चा आणि महिला आघाडीसह प्रमुख सेलच्या पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

मोरवाडी येथील शहर भाजपा जनसंपर्क कार्यालयात आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आढावा बैठका घेण्यात आल्या. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी महापौर नितीन काळजे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांचे आवाहन…

संग्राम देशमुख यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन विजयी करा, असे आवाहन आमदार लांडगे केले आहे. तसेच, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी पदवीधर मतदार पुणे पदवीधर मतदार संघातून पुन्हा एकदा विजयाची पताका फडकविली जाईल, असा विश्वासही लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

…अशी असेल मतदान पद्धत!
● पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.
● मतपत्रिकेवर नमुद उमेदवारांना आपल्या पसंतीप्रमाणे पसंती क्रमांक द्यायचा असतो.
● सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवाराच्या समोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये 1 अंक लिहायचा असतो. तर दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारा समोर 2 हा अंक लिहायचा असतो. या प्रमाणे पसंती क्रमांक देता येतो
● पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडयांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१,२,३ असे मराठीत किंवा 1,2,3 असे इंग्रजीत आकडे लिहिता येतील).
● मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करु नयेत.
● मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्यात यावा. अन्यथा मत बाद ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button