breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

गगनबावडा, कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग बंद

कोल्हापूर – बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा हा राज्यमार्ग तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद झाला आहे. रत्नागिरी महामार्ग बंद झाल्याने कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर पकडला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने मार्ग बंद झाले आहेत.पंचगंगेच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.गुरुवारी सकाळी सात वाजता पंचगंगा ३५. ७ फुटांवरून वाहू लागली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता हीच पाणीपातळी ३१. ३ फुट होती. पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट असून धोकापातळी ४३ फूट आहे. बुधवारच्या तुलनेत पावसाचा जोर जास्त असल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीची इशारा पातळीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.

कोल्हापूर- गगनबावडा रोडवर मांडुकली येथील पुलावर पाणी आल्याने मध्यरात्री हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांची मोठी रांग लागली होती. तसेच मलकापूरजवळील येलूर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोल्हापूर- रत्नागिरी मार्ग बंद झाला आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गावर रजपूतवाडीजवळ बुधवारी सकाळी पावसामुळे वडाचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारकांना वडणगे, केर्लीमार्गे शहरात यावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी झाड तोडून रस्ता रिकामा केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असून नीलजी व ऐनापूर हे दोन बंधारे पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गडहिंग्लज -चंदगड राजमार्ग वर दुपारी पर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे.

करवीर तालुक्यातील महे येथे पुलावर पाणी, निलेवाडी ऐतवडे खुर्द पूल वाहतुकीसाठी बंद महे (ता. करवीर) येथे पुलावर पाणी आल्याने निलेवाडी ऐतवडे खुर्द पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातील निळे-कारूंगले मोठा पूल आहे. त्या पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे निळे-कारूंगले-मलकापूर छोट्या वाहनांची पर्यायी वाहतूक पण बंद झाली आहे. निळे गावामध्ये राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले आहे. सध्या वाहतूक बंद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button