breaking-newsराष्ट्रिय

नोटाबंदीआधी भाजपच्या नेत्यांकडून अनियमित जमीन व्यवहार

आपचा आरोप: एका जमीन मालकाला पत्रकार परिषदेत केले हजर 
पाटणा – नोटाबंदीआधी बिहारमधील भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात अनियमित जमीन व्यवहार केल्याचा आरोप आज आम आदमी पक्षाने (आप) केला. या आरोपाची पुष्टी करण्यासाठी आपच्या पत्रकार परिषदेत एका जमीन मालकाही हजर करण्यात आले.

आपचे खासदार आणि त्या पक्षाचे बिहार प्रभारी संजय सिंह यांची येथे पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी अनियमित जमीन व्यवहारांवरून भाजपला लक्ष्य केले. भाजप नेत्यांच्या एका व्यवहारावर प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील जमीन खरेदीबाबतच्या प्रतीही पत्रकारांना वाटल्या. एवढेच नव्हे तर, एका जमीन मालकालाही यावेळी हजर करण्यात आले. त्याने भाजपचे कार्यालय बांधण्याच्या उद्देशाने जमीन देण्यासाठी त्या पक्षाच्या नेत्यांनी दबाव टाकल्याचा आरोप केला.

दरम्यान, संजय सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यावरही निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत (2015) बिहारच्या जनतेने दिलेल्या कौलाचा अनादर करून नितीश कॉंग्रेस आणि राजदच्या बरोबरच्या महाआघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर ते पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएत सहभागी झाले. मात्र, आता आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून नितीश यांना भाजपपुढे भीक मागावी लागत आहे.

भाजपबरोबर जाऊन त्यांची अवस्था केविलवाण्या व्यक्तीसारखी झाली आहे. त्यामुळे त्यांनी एनडीएमधून बाहेर पडावे, असे सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्रपक्षांच्या नेत्यांना आदराची वागणूक देत नाहीत. नितीश, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासारख्या नेत्यांबरोबर व्यासपीठावर बसतानाही मोदी अवघडल्यासारखे वाटतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button