breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#coronovirus:यवतमाळला वाढता विळखा, कोरोनाबाधितांची संख्या 25 वर

यवतमाळ : यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. यवतमाळमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 25 वर गेली आहे. मात्र आतापर्यंत 10 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने, आज आढळलेल्या नव्या रुग्णामुळे सध्या यवतमाळमध्ये अजूनही  15 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

ही व्यक्ती सुरुवातीच्या 6 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात आली होती. त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलागीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्याचा रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यामुळे आतापर्यंत यवतमाळमध्ये 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. तर त्यापैकी 10 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे.

यवतमाळमध्ये चार दिवस पूर्ण बंद

त्याआधी यवतमाळमध्ये काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे यवतमाळ शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यवतमाळ शहर 24 एप्रिलच्या दुपारी 12 वाजल्यापासून 27 एप्रिल 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहेत.

गुरुवारी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. वरील बंदच्या काळात यवतमाळ शहरातील दवाखाने, औषध दुकाने पशुवैद्यकीय दवाखाने आणि त्यांची औषध दुकाने 24 तास सुरु राहतील. तसेच दुधाची दुकाने सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुखाद्याची दुकाने सकाळी 6 ते 9 या वेळात, पेट्रोलपंप सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button